Saturday, February 4, 2023

अवैध दारूविक्री : खंडाळा तालुक्यात 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -

सातारा | आसवली व पळशी (ता.) खंडाळा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाई केली. या कारवाईत सुमारे 4 लाख 93 हजार 880 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा हातभट्टी दारु विक्री व वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक भरारी पथकाने सातारा. विभागाने जिल्हा अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई केली. खंडाळा तालुक्यातील पळशी व आसवली येथे हातभट्टी दारु विक्री व वाहतूक प्रकरणी त्यामध्ये संशयित आरोपी नारायण दिनकर चव्हाण (रा. आसवली) व अतुल विजय कुंभार, हितेश राजेश कुंभार, उर्मिला हिरो कुंभार (सर्व रा. पळशी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन चारचाकी बाहय ७३० लिटर हातभट्टी दारु असा 4 लाख 93 हजार 880 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक रोहित माने, शांताराम डोईफोडे, जीवन शिर्के आदिंनी भाग घेतला. सरकारमान्य दुकानातूनच मद्याची खरेदी करावी. बनावट मद्य, हातभट्टी दारु विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आवाहन अनिल चासकर यांनी केले आहे.