सोलापूर प्रतिनिधी । भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफीया विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील नदीपात्रातून वाळूने भरलेल्या पाच ट्रॅक्टरसह २२ लाख रूपये किंमतीचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा वाळू चोरा विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
भीमा नदी पात्रातून वाळू उपसा करायला बंदी आहे. तरी पण काही वाळू माफिया भीमा नदीतील वाळूची दिवसा ढवळ्या वाळू उपसा करतात. हि माहिती पोलिसांना काही गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी पोलिसांनी या वाळू माफियांकडून वाळूने भरलेल्या पाच ट्रॅक्टर सहित २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू चोरणाऱ्या इतर वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.