बेकायदेशीर गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाल्याची पाकिटे जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | कडेगाव येथे बेकायदेशीर गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला. ५४ किलो तंबाखूसह सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.

श्रीराम ट्रेडर्सचे मालक राम इश्‍वर देवर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले अधिक माहिती अशी, की निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदी असलेला गुटखासह सुगंधी तंबाखू रोखण्यासाठी सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. कडेगाव येथील श्रीराम ट्रेडर्समध्ये गुटखा वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. तेथे सुगंधी तंबाखू, पान मसाला, ३६० तंबाखू, गुटखा असा ५४.६३ किलोचा मुद्देमाल मिळून आला. वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

श्रीराम ट्रेडर्स या नावाने किराणा व्यवसायाचा परवनाना आहे. त्याच्याकडे गुटखा मिळून आल्याने परवानाही रद्द करण्यात आला आहे. देवर याच्यावर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात छआला. अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. हाके, नमुना साहयक चंद्रकांत साबळे यांचा कारवाईत सहभाग होता.

Leave a Comment