परतवाडा वनविभाग आणि पोलीस यांच्या धाडसी कारवाईत मौल्यवान अवैध सागवान, तयार फर्निचर जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी ।आशिष गवई
अमरावती जिल्हातील परतवाडा जवळच्या ब्राह्मणवाडा थडी येथील ३ घरांमधून वनविभाग परतवाडा तसेच ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये चार लक्ष रुपयांचे अवैध फर्निचर, व सागवान चरपटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. गावामध्ये वनविभाग व पोलिसांची धाड पडल्याची माहिती समजताच घरातून या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

मोहम्मद जाबिर, मोहम्मद जमिल अहमद अकिल आणि अकिल शेख असे घरामध्ये अवेध फर्निचर बाळगणाऱ्यांची नावे असल्याची माहिती आहे. आज परतवाडा वन विभागाला त्यांच्या घरांमधे मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या फर्निचर व सागवानि चरपटा असल्याची गुप्त माहिती मिळाली यावरून त्यांनी संबंधित ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची मदत घेत साधारण दोन वाजताच्या सुमारास संबंधित घरांवर छापा टाकला असता घरांमध्ये फर्निचरचे रेडिमेड साहित्य व मोठ्या प्रमाणावर सागवानी चरपटा त्यांना आढळून आल्या मात्र आरोपींचा शोध घेतला असता ते घटना स्थळावरून पळालेले होते.

पोलिसांनी जवळपास पाच तास घरामधून शोध घेत सागवानी फर्निचरचे अवैध साहित्य तसेच अवैद्य सागवान चरपटा मोठया शिताफीने जप्त केलेल्या आहेत. अशा प्रकारची धाडसी कारवाई ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी पहिल्यांदा झाली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले बरेच वर्षांपासून अशा वारंवार तक्रारी असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सदरची कारवाई परतवाडा वनपरीक्षेत्राचे अधिकारी पी एस भड, डी सी लोखंडे वनपाल , एस बी अहिरराव वनरक्षक, अभिजित ठाकरे , यांनी तर ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे बच्छाव आणि त्यांच्या चमूने कारवाई केली.