रामदेव बाबांना IMA ची कायदेशीर नोटीस; अखरे पतंजलीने दिले स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी म्हंटल होत की अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’. त्यानंतर IMA ने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पतंजली ने याबाबत स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

यानंतर बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पंतजली योगपीठ ट्रस्टकडून एक निवेदन जारी करण्यात आलं. “या महासाथीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत जे दिवस-रात्र काम करत आहेत अशा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बाबा रामदेव सन्मान करतात. ते कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या अन्य सदस्यांना व्हॉट्सअॅपवरील आलेला संदेश वाचून दाखवत होते,” असं त्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

पतंजली योगपीठ ट्रस्टचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ताक्षरात हे स्पष्टाकरण आहे. रामदेव बाबांचे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्यांविरोधात कुठलाही चुकीचा हेतू नाहीए. त्यांच्याविरोधात जे काही आरोप करण्यात येत आहेत ते चुकीचे आणि निरर्थक आहेत, असं स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment