भारताने ‘असा’ दाखवाला पाकव्याप्त काश्मीरवर आपला हक्क; पाकिस्तानचा तिळपापड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करत आहे अशा संकटातही भारत-पाक संघर्ष अजून पेटतच आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अजूनही तणाव असून पाकच्या कुरापती याही काळात सुरु आहेतच. त्याला थेट मैदानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिलंच. पण अनेकदा लढाई मैदानाच्याबाहेरही खेळली जाते. कदाचित म्हणूनच आणखी एका नव्या माध्यमातून भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा आपला दावा बळकट केला आहे.

भारतीय वेधशाळा देशातल्या विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर करते. त्यात शुक्रवारपासून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख सुरु केला. मुजफ्फराबाद, गिलगिट, बल्टिस्तान या जागांचा स्वतंत्र उल्लेख आयएमडीने सुरु केला आणि त्यावरुन तिकडे पाकिस्तानचा जळफळाट व्हायला सुरुवात झाली. भारताचं हे पाऊल बेकायदेशीर असून याआधीही त्यांनी असे नकाशे आणण्याचा निरर्थक प्रयत्न केल्याची टीका पाकिस्तानकडून सुरु झाली.

कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित भाग बनवण्यात आले. तेव्हापासूनच हा उल्लेख सुरु केल्याचं आयएमडीचं म्हणणं आहे. फक्त आधी हा उल्लेख प्रादेशिक हवामान वृत्तात यायचा. आता मात्र आयएमडीच्या नॉर्थ वेस्ट वेदर झोनमध्येही त्यांचा स्वतंत्र उल्लेख सुरु केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रोज प्राईम टाईममध्ये हे वेदर बुलेटिन दाखवलं जातं. लवकरच खासगी चॅनेलही वेदर बुलेटिनमध्ये पीओकेचा उल्लेख करतील असं माहिती आणि प्रसारण खात्याने म्हटलं आहे.

काश्मीर खोऱ्याचा अंदाज देताना आयएमडीकडून आधी जम्मू काश्मीर असाच उल्लेख असायचा. पण आता जम्मू काश्मीर, लडाख, मुजफ्फराबाद, गिलगिट बल्टिस्तान असा तपशीलवार उल्लेख सुरु झाला. मुजफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं. तर गिलगिट, बल्टिस्तान हे भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा भारताचा आरोप आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment