IMD Report Of Summer Season | यंदा भारतीयांना सोसावा लागणार जबरदस्त उन्हाचा चटका, IMD ने सादर केला रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IMD Report Of Summer Season | नुकताच फेब्रुवारी महिना संपून मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे. आत्तापासूनच उन्हाचा तडका जाणवायला लागलेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भारतात खूप उष्णतेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एल निनो परिस्थिती संपूर्ण हंगामात कायम राहण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, ईशान्य द्विकल्पीय भारत तेलंगणा, आंध्र प्देश आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक तसेच महाराष्ट्र आणि ओडिसाच्या अनेक भागांमध्ये यावर्षी उष्णतेची लाट जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने वर्तवलेल्या ( IMD Report Of Summer Season) अंदाजानुसार मार्चमध्ये काही देशांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यावेळी हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, भारताच्या बहुतांश भागात मार्च ते मे महिन्यात तापमान हे नेहमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मार्चमध्ये उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

ते पुढे म्हणाले की, एल निनो मध्य पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे नियमित तापमान वाढ संपूर्ण उन्हाळ्यात कायम राहील. त्यानंतर तथस्थ स्थिती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे यावर्षी नेहमीपेक्षा कमाल पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सहसा भारतातील चांगल्या माणसाच्या पावसाची संबंधित असते. ( IMD Report Of Summer Season)

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता यावर्षी नागरिकांना मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच नागरिकांना खबरदारी घेण्याची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी दरवर्षी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.