IMD Update : मान्सून लवकर! तब्बल 16 वर्षानंतर हवामानात असा बदल पुन्हा घडणार; IMD चा नवा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IMD Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असतानाच, हवामान विभागाने आता एक आशादायक बातमी दिली आहे. 16 वर्षांनंतर प्रथमच नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) वेळेआधी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर हे 2009 नंतरचे पहिले उदाहरण ठरेल, जेव्हा मान्सूनने 1 जूनच्या आधीच आपली हजेरी लावली होती.

मान्सूनची एन्ट्री लवकर (IMD Update)

IMD च्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनास पोषक हवामान तयार होईल. दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र यावर्षी, मे अखेरीसच मान्सून येण्याची शक्यताआहे. जी 2009 मध्ये शेवटची पाहायला मिळाली होती, तेव्हा 23 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला होता.

कोकणात रेड अलर्ट

दुसरीकडे, सध्या महाराष्ट्रात अनेक भागांत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. पुणे, मुंबई, कोकण परिसरात तुफान पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

कोकणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा व विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे नागरिकांची आणि वाहनांची मोठी तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेची समस्या, वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे.

Ola Uber युजर्ससाठी मोठी बातमी ! आता ‘कॅन्सल’ म्हटलं की दंड निश्चित, नवीन GR लागू

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उभ्या पिकांवर परिणाम झाला असून, भात रोपवाटिका, कांदा, भाजीपाला, आंबा इत्यादींचं मोठं नुकसान झालं आहे. हवामानातील अस्थिरतेमुळे अनेक भागांत दुर्घटना आणि विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
राज्य सरकारकडून नुकसानीच्या पाहणीचे आदेश दिले गेले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त चमूंनी पंचनामे सुरू केले आहेत.

हवामानातील बदलांकडे लक्ष देण्याची वेळ

एकीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान, तर दुसरीकडे वेळेआधी मान्सून येण्याची शक्यता हे दोन्ही चित्र हवामानाच्या अनिश्चिततेचं दर्शन घडवत आहेत. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना वेळेवर घेणे आणि स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेचा भाग होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा हवामानाचा अंदाज पाहून पुढील शेती कामाची आखणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.