IMD Weather Update : देशातील या भागांत ताशी 125 किमी वेगानं चक्रीवादळाचं संकट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

0
4
IMD
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IMD Weather Update : सध्या महाराष्ट्रात थंडी संपून कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. याबरोबरच अधून मधून कोरडे वारे सुद्धा वाहत आहेत. तर देशाच्या इतर भागांबाबत सांगायचे झाल्यास उत्तर भारतामध्ये देखील थंडीचा कडका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. पुढील महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागू शकते. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अनेक भागात अवकाळीची शक्यता (IMD Weather Update)

यंदा थंडी वेळेपूर्वी निरोप घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती (IMD Weather Update)

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम राजस्थान, पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांग्लादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, वाऱ्याचा वेग प्रती तास 125 किमी एवढा आहे.निर्माण झालेल्या या चक्रीवादळ सदृष्य स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जम्मू -काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाऊस झाला आहे.

या भागात पावसाची शक्यता

दरम्यान स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.अरुणाचल सोबतच आज आसाम, सिक्किम आणि उत्तराखंड, तसेच हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात (IMD Weather Update) आला आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात हवामानात फार बदल होणार नाहीये, थोडसं तापमान वाढण्याचा अंदाज आहे.