शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्या ; शरद पवारांची केंद्रीय मंत्री गौड यांच्याकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे आधीच शेतकरी नुकसान सहन करत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. अशा परिस्थितीत मध्यन्तरी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्या. त्यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला. अगोदरच खायला पैसे नसल्याने त्यात आता खतांच्या किमतीही वाढल्या. या किमती कमी कराव्यात अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती. मंत्री भुसे यांच्या मागणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौड यांच्याकडे खतांच्या वाढवलेल्या किमती विरोधात ट्विट करून पत्र लिहले आहे.

केंद्र सरकारने वाढविलेल्या खतांच्या किमती विरोधात शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी थेट केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. पवारांनी ट्विट करीत “अगोदरच लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आता खतांच्या किमती वाढवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. या केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत धक्क्कादायक आहे. त्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावा,” अशी मागणी पवारांनी केली आहे.

 

यापूर्वीही शरद पवार यांनी हॉटेल व बार व्यावसायिकांच्याबाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत पत्र लिहावे, अशी मागणी भाजपतील नेत्यांकडून पवारांकडे करण्यात अली होती. आता खुद्द कृषिमंत्र्यांनीच मागणी केल्यानंतर पवारांनी थेट केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडेच मागणी केली आहे.

Leave a Comment