अनैतिक संबंधातून : प्रियकर, प्रेमिकेने केलेल्या चाकू हल्ल्यात तिघे जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | अनैतिक संबंधातून चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नीसह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिरवळ येथे घडली. प्रेमसंबंधातून पतीनेच पत्नीवर, तर प्रेमिकेने प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकरांच्या सासूवर चाकूने हल्ला केला. यावेळी मेव्हण्यासही ढकलून देऊन जखमी केले.

या घटनेतील गंभीर जखमी झालेली काळूराम वचकल यांची पत्नी, सासू व मेव्हणा यांच्यावर शिंदेवाडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती काळूराम वचकल व प्रेमिका मनीषा लोहार फरारी झाले आहेत.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेची फिर्यादी संदीप दिलीप गिरी यांनी दिली आहे. फिर्यादी संदीप गिरी यांची बहीण वनिता काळूराम वचकल (मूळ रा. वीर ता. पुरंदर, जि. पुणे सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) ही पतीसमवेत शिरवळ येथील शिर्के कॉलनीमध्ये राहात आहे. शिरवळ येथे काळूराम वचकल याने प्रेमसंबंधातून मनीषा जयसिंग लोहार (रा. पाचवड, ता. वाई) या महिलेला घरी घेऊन आला व पत्नी वनिता हिला शिवीगाळ, दमदाटी करू लागला. त्यामुळे वनिता हिने भाऊ संदीप गिरी याला दूरध्वनीद्वारे बोलावून घेतले. संदीप गिरी याने बहीण वनिता हिला घेऊन मंगळवारी (ता. 15) पतीविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादरम्यान, तक्रार नोंदविल्यानंतर वनिता वचकल ही कुटुंबीयासमवेत शिर्के कॉलनी याठिकाणी दुसऱ्या दिवशी कपडे आणायला गेलेली होती. त्याठिकाणी घरामध्ये मनीषा लोहार ही दिसल्यानंतर वनिता वचकल हिने मनीषा लोहार यास, ‘तू येथे कशाला आली आहेस?’ असे म्हटल्यानंतर पती काळूराम वचकल याला राग येत त्याने घरामध्ये असणाऱ्या स्वयंपाक घरातील चाकू आणत पत्नी वनिता हिच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. या वेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या वनिता यांच्या आई शोभा गिरी यांच्यावर मनीषा लोहार हिने दुसऱ्या चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. संदीप गिरी यांना काळूराम वचकलने ढकलून दिल्याने संदीप गिरी जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संबंधितांना शिरवळ येथील खासगी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेची फिर्याद संदीप गिरी यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली असून, अधिक तपास हवालदार संजय पंडित करीत आहेत.

Leave a Comment