अमर प्रेम उठलं अन् जरंडेश्वर कारखाना हस्तांतरीत केला : आ. महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | फलटणचा लाल दिवा कसा काढून घ्यायचा, हा विचार आमच्या इथल्या आमदाराच्या डोक्यात येत होता. तेव्हा जवळचे कनेक्शन कुठून जाते तर ते औंधमधून जाते. कारण बारामती- औंध कनेक्शन लय जोरात आहे. या बहाद्दराने ताईच्या कानात सांगितलं तुम्हांला कारखाना गिप्ट देतो. ताईला कारखाना गिप्ट दिला. जरंडेश्वर कारखाना टेंडर न भरता गेला. मी सत्य बोलत आहे. अमर प्रेम एवढं उठल होत, की त्या प्रेमाला जागृत राहून तो कारखाना नावावर केला. जसा शहाजानं मुमताजच्या नावानं ताजमहाल बांधला तसा आमचा जरंडेश्वर कारखाना 27 हजार शेतकऱ्याचे शेअर्स खावून स्वतः च्या प्रेमाच्या पायात हस्तांतरीत केला, असल्याचा आरोप आ. महेश शिंदे यांनी केला आहे.

किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला असून शेतकरी विकास पॅनेल प्रचारार्थ सभेत कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी किसनवीर साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/527865552110493

महेश शिंदे म्हणाले, किसनवीर कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे आणि शेतकर्‍यांची ही मालकी टिकवणारच. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्‍यांची नियत साफ नाही. आता किसनवीर मध्ये मी लक्ष घातले आहे. किसनवीर पुढील अडचणींचाही निपटारा करुन दाखवू. किसनवीर कारखाना जरंडेश्‍वरप्रमाणे खासगी करण्याचा डाव हाणून पाडा. विरोधकांनी जरंडेश्‍वर अडचणीत आणला आणि कवडीमोल किंमतीत हडपला. किसनवीरबाबतही तोच डाव असून तो उधळून लावा. आमदार महेशदादा शिंदे साहेब यांचे सभासदांना आवाहन.

शालिनीताई यांच्याबाबत वावड्या उटल्या

शालिनीताई यांच्या नातेवाईकांनी कारखाना खाल्ला वावड्या उटल्या. जरंडेश्वर सहकारी कारखाना हिंदुह्दयसम्राट यांच्या सहकार्यामुळे उभा राहिला. ताईंची परिस्थिती केअरटेकरला आज पैसे देण्याचीही नाही. जरंडेश्वर कारखाना टेंडर न भरता गुरू कमोडीजला दिला. जरंडेश्वर कारखान्याच्या 27 हजार सभासदाचे बारामतीच्या नेत्यांने 13 कोटी खाल्ले, तरी यांची उडंगी म्हणतायत ताईंच्या नातेवाईंकनी कारखाना खाल्ला.

Leave a Comment