नवी दिल्ली । मंगळवारी देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पने मंगळवारी सांगितले की,”गेल्या महिन्यात त्यांनी 1,83,044 दुचाकींची विक्री केली असून ती एप्रिलमध्ये विक्री झालेल्या 3,72,285 वाहनांपेक्षा 51 टक्क्यांनी कमी आहे.” कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की,”लॉकडाऊन मुले त्यांच्या प्लांट्समध्ये कोणतेही काम झालेले नाही. गेल्या महिन्यात लॉकडाऊन लादल्यामुळे त्यांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला होता.”
कंपनीने 22 एप्रिल रोजी देशभरातील त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समधील काम बंद केले होते. गुरुग्राम, हरिद्वार आणि धारुहेरा येथील त्यांच्यातील तीन प्लांट्सनी 17 मेपासून एका शिफ्टमध्ये पुन्हा काम सुरू केले आणि त्यानंतर नीमराणा, हललोल आणि चित्तूर येथील आणखी तीन प्लांट्सनी 24 मेपासून काम सुरू केले.
कंपनीने म्हटले आहे की,” सध्याची परिस्थिती लक्षात घेता मे महिन्यातील विक्रीची मागील वर्षाच्या संबंधित महिन्याशी आणि या वर्षाच्या इतर महिन्यांशी तुलना करता येणार नाही.” हीरो मोटोकॉर्पने पुढे सांगितले की,” कंपनी या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे आणि हळू हळू दोन्ही शिफ्टमध्ये प्रोडक्शन सुरू करेल.”
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची 1.32 लाख प्रकरणे
विशेष म्हणजे, देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट दुर्बल होत असल्याचे दिसते आहे. गेल्या 24 तासांत देशभरातील 1 लाख 32 हजार 788 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.या दरम्यान 3207 लोकं या संक्रमणामुळे मरण पावले. मात्र संक्रमित 2 लाख 31 हजार 456 लोकही बरे झाले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 35 हजार 949 लोकांनी कोरोनाला पराभूत केले. तामिळनाडूमध्ये 31,683 लोक, कर्नाटकमध्ये 29,271 आणि केरळमध्ये 24,117 लोकं बरे झाले.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत देशात कोरोनाची 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 3 लाख 35 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूपासून आतापर्यंत 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 लोकं बरे झाले आहेत. सध्या 17 लाख 93 हजार 645 लोकांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच ते कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा