सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गावा- गावात, खेड्या- पाड्यात, डोंगर- कपाऱ्यात असो कि शहराच्या कानाकोपऱ्यात लोकांना वाहतूकीला मदत करणारी बससेवेची लाॅकडाऊननंतर चाके काही प्रमाणात थांबलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकातून केवळ 42 बस गाड्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर धावत आहेत. संचारबंदीचा फटका एसटी महामंडळा बरोबर प्रवाशांनाही बसत आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांत मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सातारा बसस्थानकातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा करता बस काही प्रमाणात नागरिकांच्या करिता चालू आहेत. सातारा बसस्थानकांवर नेहमी 24 तास गर्दी पाहायला मिळत असते, त्याच बसस्थानकात लॉकडाऊन लागल्यापासून शुकशुकाट पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांची तसेच बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यातील बस डेपो मधून बाहेर जाणाऱ्या बसेस पुढीलप्रमाणे (एकूण 42 बसेस) ः
सातारा बसस्थानकांतून 6 बस ः पुणे 3 बसेस, सकाळी 7.30, सकाळी 8.30 आणि दुपारी 2.30 वाजता तर कराड 1 बस, सकाळी 8 वाजता, पाटण 1 बस, सकाळी 8 वाजता, फलटण 1 बस, सकाळी 8 वाजता. वडूज मार्गे दहिवडी 1 बस. कराड बसस्थानकांतून 4 बस ः सातारा व पाटण प्रत्येकी 2 बसेस. मेढा बसस्थानकांतून 1 बस ः सातारा 1 बस. महाबळेश्वर बसस्थानकांतून 5 बस ः सातारा व पुणे स्टेशन प्रत्येकी 2 बस, वाई 1 बस. पाटण बसस्थानकांतून 4 बस ः सातारा व कराड प्रत्येकी 2 बस. वडूज बसस्थानकांतून 3 बस ः आैध मार्गे सातारा 1 बस, पुसेगांव मार्गे सातारा 2 बस. वाई बसस्थानकांतून 4 बस ः स्वारगेट व सातारा प्रत्येकी 2 बस. कोरेगांव बसस्थानकांतून 2 बस ः कराड, सातारा- दहिवडी प्रत्येकी 1 बस. दहिवडी बसस्थानकांतून 2 बस ः कराड व सातारा प्रत्येकी 1 बस. पारगांव खंडाळा बसस्थानकांतून 2 बस ः लोणंद व सातारा प्रत्येकी 1 बस. फलटण बसस्थानकांतून 9 बस ः शिर्डी (नगरमधून परत), बोरिवली, इंचलकरंजी (विटा परत), अक्कलकोट (पंढरपूर परत), जोतिबा (सातारा परत), मुंबई (स्वारगेट परत), बोरिवली (स्वारगेट परत), बारामती व सातारा प्रत्येकी 1 बस सोडण्यात येत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा