मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावरील 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा केली जात असताना राज्य सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली असून ही समिती मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार आहे.

राज्य सरकारच्यावतीने आज कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक घेण्यात आली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. यावेळी पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

दरम्यान, आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण असलेल्या तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार आहे.

Leave a Comment