Sunday, April 2, 2023

BREAKING NEWS : मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

- Advertisement -

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. तसेच रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.

- Advertisement -

अवैध दारू विक्री व गुन्हेगारीत वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.