Important Documents | गाडी चालताना ‘हे’ डॉक्युमेंट्स ठेवा जवळ; अन्यथा बसेल 10 हजारांचा भुर्दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Important Documents | प्रवास करताना जर आपण स्वतःची गाडी चालवत असाल, तर गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. त्याचप्रमाणे सुरक्षित ड्रायविंग करावी लागते. तसेच काही महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवावी लागतात. जेणेकरून जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला, तरी तुम्हाला ही कागदपत्र दाखवता येईल. तुमच्याकडे जर ही कागदपत्र नसेल आणि पोलिसांनी मागितली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडे जर ही कागदपत्रे नसेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. आता ही कोण कोणती डॉक्युमेंट्स आहेत? (Important Documents ) ते आपण जाणून घेऊया.

ड्रायव्हिंग लायसन | Important Documents

मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय नियम 1989 यांच्यानुसार रस्त्यावरून जर वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लायसन असणे खूप गरजेचे आहे. या कागदपत्रातून तुमची ओळख, राष्ट्रीयत्व, वय आणि इतर सगळ्या गोष्टींची ओळख पटते. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल, तर देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला ड्रायव्हिंग करता येते. त्याचबरोबर तुमच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडली, तर ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुमचा वीमा क्लेम होणार नाही.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

जो व्यक्ती कार चालवत आहे. त्या व्यक्तीच्या नावावर कार आहे की नाही हे माहित असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा आरसी पुरावा गरजेचे आहे. त्यामुळे ही कार आरटीओमध्ये रजिस्टर आहे की नाही? याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. विमा क्लेम करणाऱ्याच्या वाहन आणि दाव्याची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी ही काही कागदपत्र खूप गरजेची आहेत. यामध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, मालकाचे नाव, कारचा प्रकार नोंदणी तारीख, अंतिम तारीख, चेसेस नंबर, इंजिन नंबर या सगळ्याची माहिती असते.

थर्ड पार्टी विमा

1988 च्या मोटार वाहन अधिनियमानुसार तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्याकडे विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. किंवा संपत्तीचे नुकसान झाले, तर त्याला आर्थिक संरक्षण दिले जाते.

पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट | Important Documents

गाडी चालवताना तुमच्याकडे पोझिशन सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे. हे सर्टिफिकेट तुमच्या वाहनातील कार्बनच्या उत्सर्जनाची लेवल किती आहे? याची माहिती देते. तुमची कार किती काळापर्यंत कार्बन उत्सर्जित करते. आणि नियम तसेच इतर मानकांचे पालन केले जाते. हे या सर्टिफिकेट मधून सिद्ध होते. तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

ओळखपत्र संबंधी कागदपत्रे

गाडी चालवताना तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड यांसारखे डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासाठी ओळखपत्र म्हणून ही कागदपत्र कामाला येतात.