Mangalgraha Mandir : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे मंगळ ग्रहाचे स्वयंभू मूर्तीमंदिर; जिथे VIP सुविधा मिळत नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangalgraha Mandir) आपल्या जन्म कुंडलीमध्ये नवग्रहांचे स्थान किती महत्वाचे आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यात मंगळ ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीवर विशेष प्रभाव टाकते. अनेकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोषाची समस्या असते. जिच्या निवारणासाठी मंगळ ग्रहाची शांती करण्याचा सल्ला दिला जातो. खरतर मंगळ ग्रह नावाप्रमाणे मंगलकारी आहे. मात्र, असे असूनही अनेकांना या ग्रहाच्या स्थितीबाबत बरेच समज गैरसमज आहेत. ज्योतिषशास्त्रात, जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ ग्रहदोष असेल तर त्या व्यक्तीचे लग्न ठरताना अनेक समस्या येतात. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीला आयुष्यात बराच संघर्ष करावा लागतो, असे सांगितले जाते.

कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबतच विवाह करावा लागतो. अन्यथा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी मंगळ दोष निवारण करण्यासाठी एक विशिष्ट पूजा केली जाते. जी मंगळ ग्रहाच्या देवालयात केल्यास अधिक लाभ मिळतो. (Mangalgraha Mandir) मात्र, अनेक लोकांना मंगळ ग्रहाचे मंदिर नेमके कुठे आहे? याबाबत माहिती नाही. तीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात एकमेव मूर्तीरुपी मंगळ देवाचे मंदिर आहे. जिथे मंगळ दोष निवारणासाठी लांबून भाविक येतात. हे मंदिर कुठे आहे? याविषयी जाणून घेऊ.

कुठे आहे मंगळ देवाचं मूर्तीरुपी मंदिर?

महाराष्ट्रात जळगावमधील अमळनेरमध्ये मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव मंगळ ग्रहाचे मंदिर (Mangalgraha Mandir) आहे. जिथे मंगळ देवाची स्वयंभू मूर्ती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भाविक येथे मंगळ दोषाची समस्या निवारण करण्यासाठी आणि विशेष पूजा विधींसाठी या मंदिराला भेट देतात. हे मंगळ ग्रह मंदिर जळगाव पासून अमळनेरमध्ये सुमारे ६० किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर हे सुमारे ३६ किमी अंतरावर आहे.

मंदिराचा इतिहास (Mangalgraha Mandir)

या मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला. मात्र, १९४० नंतर हे मंदिर दुर्लक्षित झाल्याने भग्न झाले होते. पुढे १९९९ नंतर या मंदिराचे पुन्हा जीर्णोद्धार झाला आणि या मंदिराचा कायापालट झाला. या मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर असून इथे दर मंगळवारी सुमारे ८० हजार ते १ लाखापर्यंत भाविक तथा पर्यटक येताना दिसतात.

दर्शनासाठी VIP सुविधा नाही

या मंदिराबाबत सांगायची खास बाब अशी की, इथे कुणीही VIP नसून सगळ्यांसाठी समान सुविधा आहेत. या मंदिरात कोणत्याही प्रकाराचा टॅक्स घेतला जात नाही. (Mangalgraha Mandir) शिवाय पार्किंगसाठीसुद्धा शुल्क आकारले जात नाही. मंगळदेवाच्या दर्शनासाठी इथे VIP सुविधादेखील उपलब्ध नाही आणि मंदिराबाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दरसुद्धा आकारले जात नाहीत.

या मंदिराचा भारतात दुसरा क्रमांक

उज्जैनमध्ये देखील असेच मंगळ देवाचे एक मंदिर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे मंगळ ग्रह मंदिर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील मंगळग्रह मंदिर आहे. ज्या लोकांना मंगळ ग्रह दोष आहे, असे लोक या मंदिराला आवर्जून भेट देतात. इथे येऊन पूजा केल्यानंतर मंगळ ग्रहाची पीडा, त्रास आणि समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. महाराष्ट्रातील या मंगळग्रह मंदिरात मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती आहे. (Mangalgraha Mandir) तसेच या मंदिरात श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची देखील मूर्ती आहे.