Monday, February 6, 2023

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, कस्टमर केअर नंबर बाबत बँकेने दिला इशारा

- Advertisement -

नवी दिल्ली । देशात बँकिंग फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशी फसवणूक करणारे लोकांना अनेक नवनवीन मार्गांनी त्यांच्या फसवणुकीचे बळी बनवत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी, देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया सतत लोकांना चेतावणी देत ​​आहे. या अनुक्रमात SBI ने बुधवारी आणखी एक ट्वीट जारी केले असून, आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

SBI ने ट्विट करून बनावट कस्टमर केअर नंबर बाबत सतर्क केले आहे. बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बनावट कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. कृपया योग्य कस्टमर केअर नंबरसाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. कोणाशीही गोपनीय बँकिंग माहिती शेअर करण्यापासून सावध रहा.”

- Advertisement -

बँकेने या ट्वीटमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने फोनवर बनावट कस्टमर केअर नंबरवर कॉल केला, ज्यामध्ये सर्व माहिती घेऊन खाते रिकामे केले गेले आहे. या व्हिडीओच्या शेवटी असेही म्हटले आहे की,”कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याबाबत त्वरित तक्रार करा. तुम्ही report.phising@sbi.co.in किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करू शकता.”

फ्री गिफ्टच्या नादात खाते रिकामे होऊ शकेल
अलीकडेच, SBI ने ग्राहकांना फ्री गिफ्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. बँकेने ट्विटरद्वारे म्हटले होते की,” फसवणूक करणारे ग्राहकांना फ्री गिफ्टच्या नावावर एक लिंक पाठवून त्यांचे पर्सनल डिटेल्स चोरत आहेत.”