SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – यामुळे आज तुमचा UPI ट्रान्सझॅक्शन अडकला आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्ही एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 20 सप्टेंबर रोजी तुम्हाला बँकेच्या काही सुविधांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बँक त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी बँक आपल्या UPI platform मध्ये काही बदल करीत असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे, बँकेच्या UPI ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस प्रभावित होऊ शकते. बँकेने ग्राहकांना आवाहन केले आहे की, ते बँकेच्या अन्य डिजिटल चॅनेल्स जसे की, SBIYONO, Yono light किंवा नेट बँकिंग सर्व्हिस ट्रान्सझॅक्शन किंवा इतर प्रकारच्या बँकिंगसाठी वापरू शकतात. या सेवांचा बँकेने केलेल्या अपग्रेडमुळे परिणाम होणार नाही.

UPI अंतर्गत मनी ट्रान्सझॅक्शन झपाट्याने वाढले
UPI अंतर्गत पैशांचे व्यवहार सामान्य झाले आहेत. UPI अॅप वापरणार्‍या लोकांना त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते त्याद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की, जर आपण याद्वारे पैसे ट्रान्सफर केले तर आपल्याला कोणालाही बँक खात्याबद्दल माहिती देण्याची गरज नाही.

याद्वारे तुम्ही तुमचे मोबाईल फोन बिल, वीज बिल, ब्रॉडबँड बिल भरण्यासह अन्य सर्व आवश्यक कामेही करु शकता. SBI ग्राहक एकाच वेळी जास्तीत जास्त 10,000 आणि Yono light अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 25,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन करू शकतात.

UPI मार्फत ट्रान्सझॅक्शन फेल्ड झाल्यास काय करावे? – SBI ग्राहक एकाच वेळी जास्तीत जास्त 10,000 आणि योनो लाइट अ‍ॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 25,000 रुपयांचा व्यवहार करू शकतात.

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यूपीआय फंड ट्रान्सफर दरम्यान अनेक वेळा ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एसबीआय ग्राहक Yono light अॅपद्वारे UPI सेवेचा लाभ घेऊ शकतात. UPI फंड ट्रान्सफर अयशस्वी झाल्यामुळे खात्यातून बर्‍याच वेळा पैसे कट केले जातात परंतु ट्रान्सझॅक्शन शक्यमात्र झालेले नसते.

एकदा ट्रान्सझॅक्शन फेल्ड झाले आणि खात्यातून पैसे डेबिट झाल्यावर ही रक्कम आपोआप आपल्या खात्यात परत येते. आपल्याला पैसे परत न आल्यास, आपण Yono light अॅपवर तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला ‘Payment History’ या पर्यायावर जाऊन आणि ‘Raise Dispute’ वर जावे लागेल आणि आपल्याला येथे आपली तक्रार दाखल करावी लागेल.

तक्रार कशी दाखल ‘Payment History’ पेमेंट हिस्ट्री’ पर्यायावर जाऊन तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला particular transaction ची निवड करुन ‘Raise Dispute’ वर जावे लागेल. आपण एसबीआय पर्सनल अॅपमधील UPI सुविधेअंतर्गत “Dispute Status” मॉड्यूलमधील स्थिती तपासू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment