SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 1 एप्रिलपासून थांबविली जाऊ शकेल SMS सर्व्हिस

नवी दिल्ली । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) शुक्रवारी अशा 40 डिफॉल्टर युनिट्सची लिस्ट जाहीर केली आहे, जे वारंवार आठवण करून देऊनही बल्क SMS साठी लागू असलेल्या नियमांची पूर्तता करत नाहीत. या संस्थांमध्ये देशातील सर्वात मोठी सार्वजनिक आणि खासगी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बँक (HDFC), कोटक महिंद्र बँक, LIC यांचा समावेश आहे. या प्रमुख युनिट्सना याबद्दल बर्‍याच वेळा सांगितले गेले आहे.

नियमांचे पालन करण्यासाठी 31 मार्च अंतिम मुदत
या विषयावर आपली भूमिका कडक करताना TRAI ने म्हटले आहे की, 31 मार्च, 2021 पर्यंत हे नियम पूर्ण करावे लागतील. तसे न केल्यास, 1 एप्रिल 2021 पासून ग्राहकांशी त्यांच्या संवादात व्यत्यय आणू शकतात.

TRAI ने एका निवेदनात म्हटले आहे की,” प्रमुख युनिट्स / टेलि मार्केटिंग कंपन्यांना नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली आहे. ग्राहकांना यापुढे नियामक फायदे नाकारले जाऊ शकत नाहीत. हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे की 1 एप्रिलपासूनच्या SMS द्वारे नियामक आवश्यकतांचे पालन केले नाही तर सिस्टमद्वारे ते थांबवले जाईल.”

या नियमांचे पालन केलेच पाहिजे
नियमांनुसार, कमर्शिअल टेक्स्ट मेसेजेस पाठवणाऱ्या युनिटसना टेलिकॉम ऑपरेटरकडे मेसेज हेडर आणि टेम्पलेटची नोंदणी करावी लागतील. जेव्हा एसएमएस आणि ओटीपी बँक, पेमेंट कंपन्या आणि इतर युझर्सकडे जातील तेव्हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड टेम्पलेटमधून त्याची तपासणी केली जाईल. या प्रक्रियेस एसएमएस स्क्रबिंग असे म्हणतात.

बनावट SMS थांबविण्यासाठी उचलली पावले
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ट्रायचे कमर्शिअल मेसेजेस नियम अवांछित आणि फसव्या SMS ना थांबविण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहेत. ट्रायने स्क्रबिंग डेटा आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे सादर केलेल्या रिपोर्टचे विश्लेषण केले आहे. यासंदर्भात त्यांनी 25 मार्च 2021 रोजी टेल-मार्केटिंग कंपन्या / अ‍ॅग्रिगेटर्स यांच्याशी आधीच बैठक घेतली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like