चार अधिकारी बसून लॉक डाऊन चा निर्णय घेतात ; आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आहोत का? – खासदार जलील

औरंगाबाद | लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता चार अधिकारी लॉक डाऊनसारखा कठोर निर्णय घेत आहेत. तर मग औरंगाबाद जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी काय गोटया खेळण्यासाठी आहेत का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. याच बरोबर लॉकडाऊन नको मात्र निर्बंध घाला अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स ची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील त्याचबरोबर विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये अंशतः लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला तो जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी जाहीर केला.

या लॉकडाऊन मध्ये काही बाबींवर निर्बंध घालण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने आठवडी बाजार बंद करण्यात आले, आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी शेतकऱ्यांची बाजारपेठ समजली जाणारी जाधववाडी मंडी देखील बंद करण्यात आली, तसेच विवाहावरती पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. हेच निर्णय जिल्हा खासदार इम्तियाज जलील यांना जिव्हारी लागले आहेत. कारण या बैठकीमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला, लोकप्रतिनिधींना प्रवेश नव्हता त्यामुळेच की काय आज खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे चार अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉक डाऊन सारखा निर्णय घेत आहेत त्याच बरोबर कोर्टमॅरेज सारखा सल्ला देत आहेत, मात्र कोर्टमॅरेज साठी एक महिन्याचा अवधी लागतो त्यामुळे ज्या प्रमाणे जिल्ह्यात कंपनी सुरू आहेत त्याप्रमाणे निर्बंध घालून विवाहदेखील काही अटी व शर्ती वरती सुरू ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार जलील यांनी केली. तर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही तर आम्ही काय गोटया खेळण्यासाठी आहोत की काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

या चार अधिकाऱ्यांची व्हारस शी बैठक झाली का?

या बैठकीमध्ये शनिवारी आणि रविवारी संपूर्णतः लोक जाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच लॉकडाउन ला विरोध करीत खासदार इम्तियाज जलील यांनी या चार अधिकाऱ्यांशी वायरस ने बैठक केली आहे की काय असा मिश्किल टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला व ज्यांना लग्न करायचे असतील त्यांना आम्ही सहकार्य करू असं देखील यावेळी म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group