व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा”; जलील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्रेनबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ज्या केंद्र सरकारने ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा, अशी टीका जलील यांनी केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “कोरोना काळात ट्रेन रिकाम्या जायला हव्या होत्या असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. खरं तर चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा. त्यामुळे किती बुद्धिमान माणसं आपल्या देशात होऊन गेली ते पुढच्या पिढ्यांना समजेल, असा टोला यावेळी जलील यांनी लगावला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधान केले. यावेळी ते म्हणाले की, “केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. लॉकडाउन झाला तरी लोकांना आम्ही तुमची काळजी करु हा आत्मविश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करायला हवा होता. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे पाटील यांनी म्हटले.