कोरोनाच्या संकटात सोनिया गांधींनी पत्रातून केल्या मोदींना ‘या’ ५ सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याबाबत ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनामुळं देशावर आर्थिक संकट तयार झालं असून मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय घ्यायला हवेत असंही सोनिया गांधी यांनी या पत्रात म्हटलं आहे.

सोनिया गांधींनी केलेल्या ह्याच त्या ५ सूचना
) सरकारद्वारे टीव्ही, प्रिंट आणि ऑनलाइन मीडियाला दिल्या जाणाऱ्या सगळ्या जाहिराती थांबवण्यात याव्यात. दोन वर्षांसाठी हा निर्णय घेतला तर १२५० कोटींची बचत दरवर्षी होईल. हा निधी करोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरु शकतो.

२) सरकारी इमारतींच्या बांधकामांसाठी जे २० हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत ती मंजुरी मागे घ्यावी. संसदेच्या सध्याच्या इमारतीत चांगले काम होते आहे. सरकारने हा निधी रुग्णालय सुधारणा, पीपीई यांसाठी खर्च करावा

३) खासदारांचं वेतन, पेन्शनमध्ये जी ३० टक्के कपात करण्यात आली आहे तो निधी कामगार वर्ग, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी देण्यात यावा

४) राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अधिकारी यांचे विदेश दौरे थांबवण्यात यावेत. या प्रवासखर्चाची जी बचत होईल ती रक्कम करोनाविरोधी लढाईसाठी वापरण्यात यावी. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचे दौरे थांबवले तरीही ३९३ कोटी रुपये वाचू शकतात असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

५) PM CARES ला जो काही निधी मदत म्हणून देण्यात आला आहे तो पंतप्रधान मदत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा. पंतप्रधान मदत निधीमध्ये सध्या ३८०० कोटी रुपये आहेत. अशात दोन फंडांची रक्कम एकत्र केली तर ते योग्यच ठरेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment