हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील सर्व डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा नवा स्ट्रेन इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतो आहे की वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्याची लागण झपाट्यानं होत आहे. अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे अमरावतीत जिल्हा शल्यचिकित्सकांसह पंचवीस जणांचा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांच्यासह 19 नर्सेस आणि 5 अटेंडन्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच आठवड्यात रुग्णालयातील पंचवीस जणांचा स्टाफ पॉझिटिव्ह झाला आहे. विशेष बाब म्हणजे निकम यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय स्टाफ मधील बहुतेक जणांनी लस घेतली असल्याची माहितीही समोर आली आहे मात्र लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही असा कोणताही दावा लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केला नाही.
अमरावती कोरोना आकडेवारी
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 813 रूग्ण दगावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर काल सांयकाळपर्यत 530 नवे रुग्ण आढळून आलेत. काल जिल्ह्यात 280 हुन अधिक कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या विविध कोरोना रुग्णालयात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या 813 वर पोहोचली आहे. जिल्हात एकूण 58,385 हजारांच्यावर रुग्ण बाधीत आढळले आहेत. त्यापेॆेकी 51,663 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. सध्या जिल्ह्यत 5,889 ऍक्टीव रुग्ण आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. तर मृत रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने आता पंचसूत्रीचे पालन करन्याचे व त्यांची अंमलबजावणी करन्याचे तसेच उल्लंघन करणार्यांवर दंड करन्याच्या सुचना केलेल्या आहेत. त्यामध्ये चाचणी व लसीकरणाचा समावेष आहे. अमरावती जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली वाढली आहे. त्यामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.