अमरावतीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये खाजगी बस नाल्यात पडल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि बस अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशकडे जात होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरात हा अपघात घडला आहे. बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या अपघातातून आला.

जखमी प्रवासी रुग्णालयात
दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने भरलेली होती. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.

मोठ्या प्रमाणात खाजगी बसने वाहतूक
एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.