आरेवाडीत श्री. भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला आहे. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला केवळ एक जागा बिनविरोध करण्यात यश आले होते, त्यावरच समाधान मानावे लागले.

विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मते) ः- सर्वसाधारण मतदार संघातून ः रमेश अधिकराव कणसे (139), संपत शंकर चव्हाण (139), संजय रामचंद्र ढगाले (145), प्रल्हाद अंतु देसाई (144), विलास बापू देसाई (148), रघुनाथ पोपट बाबर (136), मधुकर शंकर यादव (145), संजय संपत यादव (136) महिला राखीव मतदार संघातून- बेबीताई मुराजी देसाई (148), सुमन शिवाजी यादव (146) तर इतर मागास प्रवर्गातून निजाम मज्जीद मुल्ला आणि विमुक्त मागास प्रवर्गातून मारुती बाबुराव चव्हाण हे दोघे बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्गात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने सदरची जागा रिक्त राहिली.

विजयी उमेदवारांचे लक्ष्मण देसाई, हनमंत यादव, शिवाजी यादव, दिलीप देसाई, प्रा. अशोक चव्हाण, विठ्ठल जाधव, अशोक यादव, सुधीर गोंजारी, कृष्णत ढगाले यांनी अभिनंदन केले.