कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील दत्त चाैकात आज सकाळी दुकानाचे शटर उचलले अन् साप काचेवर दिसल्याने पळापळ उडाली. अखेर सर्पमित्र अजय महाडिक यांना बोलावून हा साप पकडण्यात यश आले. मंगळवारी सकाळी 9 वाजता हा साप दुकानात जात असताना आढळून आल्याने चांगलीच पंचाईत झाली.
घटनास्थळावरील माहिती अशी, दत्त चाैकात छ. शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस एक अपार्टमेंट आहे. तिथे सकाळी मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते. त्यांनी शटर उचलले अन् तोपर्यंत शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने साप असल्याचे सांगितले. त्यामुळे मालक यांनी सावधगिरी बाळगून तात्काळ तेथून थोड्या अंतरावर लांब थांबले.
त्यानंतर कराड येथील सर्पमित्राला माहिती दिली. तात्काळ सर्पमित्र अजय महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेत तो साप सुरक्षितरित्या पकडला. तसेच त्याला अज्ञात वासात सोडले. या घटनेची माहिती इतर दुकान मालकांना मिळताच त्यांनीही साप पाहण्यासाठी दुकानाकडे धाव घेतली. सदरचा साप हा तस्कर जातीचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.