मुलांच्या समोरच पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून केला खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सकाळी चहा पीत असताना घर रिकामे करण्यावरुन झालेल्या वादातुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली. जिन्सी ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या टीमने आरोपी पतीला वैजापूर येथे ठोकल्या आहेत.

अंजुम खलील शेख (35, रा. गल्ली नंबर 21, बायजीपुरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. हत्या करणारा पती खलील शेख ईस्माईल शेख (42) याला वैजापूर तालुक्यातील निजामपूर गावातून मध्यरात्रीनंतर उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्या पथकाने अटक केली.

व्दिभार्या ट्रक चालकाने घर रिकामे करण्याच्या कारणावरुन मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. ही भयंकर घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बायजीपुरा, इंदिरानगर भागात घडली. अंजुम खलील शेख (35) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी मारेकरी पती खलील शेख ईस्माइल शेख (42) याला वैजापूर तालुक्यातील निजामपूर गावातून ताब्यात घेण्यात आले.

Leave a Comment