कल्याणमध्ये CCTV कॅमेरा फिरवून चोरट्यांचा दुकानावर डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये बंद दुकानांचे शटर उचकटून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला (Theft) महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. मोहंमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान असे या चोरट्याचे नाव असून तो उल्हासनगर येथील रहिवाशी आहे. महात्मा फुले पोलिसांनी उल्हासनगरमधील खेमानी परिसरात सापळा रचून या आरोपीला अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक
या चोरट्याने एका मिठाईच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील पैसे व मुद्देमाल चोरी (Theft) केला आहे. हे दोघे सराईत चोरटे होते. या चोरट्यांना दुकानात सीसीटीव्ही असल्याचे माहिती पडताच दोघांमधील एकाने स्टूलवर चढत सीसीटीव्ही फिरवले. मात्र या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे दोन चोरटे (Theft) कैद झाले आहेत.

हे सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याचा (Theft) शोध सुरू केला. या चोरट्याचं नाव मोहंमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान असून त्याचा एक अल्पवयीन साथीदार आहे. हे दोघे उल्हासनगर खेमानी परिसरात राहतात. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी उल्हासनगर खेमाणी परिसरात सापळा रचून मोहम्मदला अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Leave a Comment