मुंबई । देशभरात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून मागील २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत उचांकी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,३६,८६१ इतकी झाली आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ८,४९,४३१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, आतापर्यंत देशातील ३१,३५८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Single-day spike of 48,916 positive cases & 757 deaths in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 13,36,861 including 4,56,071 active cases, 8,49,431 cured/discharged/migrated & 31,358 deaths: Health Ministry pic.twitter.com/HPEz5soYu0
— ANI (@ANI) July 25, 2020
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९,६१५ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,५७,११७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने ICMR मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्यास रुग्णांचे प्रमाण काही दिवस वाढेल. पण नंतर दिल्लीप्रमाणे हळुहळू रुग्णांची संख्या कमीदेखील होईल. तसेच मृत्यूदरही कमी होईल, असे ICMR चे म्हणणे आहे.
१ ते २२ जुलै या कालावधीत मुंबईत १,२२,७५९ कोरोना चाचण्या झाल्या. तर दिल्लीत याच काळात ३,१९,५५९ कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तामिळनाडूतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,९९,७४९ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत आतापर्यंत १,२८,३८९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”