दिलासादायक! मागील २४ तासात प्रथमच ‘इतक्या’ मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांना दवाखान्यातून डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्यानं फैलाव होतो आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयन्त करत असतानाच याच प्रयत्नांना काही अंशी का असेना, पण यश मिळत असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मागील २४ तासांमध्ये कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नव्यानं तब्बल २० हजार ५७२ रुग्णांनी कोरोना व्हायरसवर मात केल्यामुळं आता या संकटाला सामोरं जाऊन यशस्वीपणे कोरोनाचा नायनाट करणाऱ्या देशातील एकूण रुग्णांचा आकडा ५ लाख ९१ हजार ०३१ वर पोहोचला आहे. परिणामी देशभरात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा आता ६३.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, कोरोनाची नव्यानं लागण झालेल्या रुग्णांचा आकड्यानुसार, मागील २४ तासांत देशात कोरोनाचे २९,४२९ रुग्ण वाढले असून ५८२ रुग्णांना मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या ९ लाख ३६ हजार १८१ वर पोहोचली आहे. सध्या देशात ३ लाख १९ हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment