पाटण | मल्हारपेठ (ता. पाटण) येथील सिध्दीविनायक गणेश मंडळ व शिवशक्ती गणेशोत्सव 2022 निमित्ताने भव्य गाैरी- गणपती सजावट व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डान्स स्पर्धेत सातारा येथील राजवीर कुंभार (राजविका डान्स, सातारा) याने पहिल्या क्रमाकांचे 10 हजाराचे बक्षीस पटकाविले. तर गाैरी- गणपती सजावट स्पर्धेत 5 हजार 1 रूपये व पैठणी भागीरथी उत्तम देसाई यांनी पटकाविली.
सिद्धिविनायक व शिवशक्ती गणेश मंडळ, मल्हारपेठ यांच्या साैज्यण्याने गणेशोत्सव 2022 आोयजित केला होता. डान्स स्पर्धेचे उदघाटन समारंभ माजी सरपंच गौरीहर दशवंत, संजय शेटे यांच्यासह शिवशक्ती गणेश मंडळ व श्री सिद्धिविनायक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. विलास माने, बाळासाहेब शेटे, दयानंद शिलवंत यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
मल्हारपेठ येथे डान्स स्पर्धेतील सादर केलेली लावणी @shambhurajdesai @officialdwts pic.twitter.com/o4t8I6ZnD6
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) September 7, 2022
गाैरी- गणपती सजावट स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः- प्रथम क्रमांक- भागीरथी उत्तम देसाई (5001 रूपये व पैठणी), द्वितीय क्रमांक- जयश्री शंकरराव जाधव (3001 रूपये व पैठणी), तृतीय क्रमांक- शितल सागर दशवंत (2001 रूपये व पैठणी) तर गाैरी- गणपती सजावट स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः-प्रथम क्रमांक (रोख- 10,001 रूपये) – राजवीर कुंभार (राजविका डान्स, सातारा), द्वितीय क्रमांक (रोख- 7001 रूपये)- सृष्टी जाधव (वडूज, ता. खटाव), तृतीय क्रमांक (रोख- 5001 रूपये)- पुरब पाटील (सातारा) अशी विजेत्यांची नावे आहेत. सतिश यादव यांनी सूत्रसंचालन केले.