मल्हारपेठमध्ये तोतया पोलिसांकडून वृध्दाचे सोने हातचलाखीने लंपास

पाटण | मल्हारपेठ येथील हरणेश्वर पुलानजीक पोलीस अधिकारी आहे, असे सांगून एकाचे दिड तोळे वजनाचे सोने हातचलाखीने चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत दिनकर शंकर कुंभार (वय- 75) यांनी याबाबत मल्हारपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, कराड- पाटण राज्य महामार्गावर मल्हारपेठ नजीक असणार्‍या हरणेश्वर पुलाजवळ बुधवार दिनांक 20 रोजी पाटणकडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा जणांनी आम्ही पोलीस अधिकारी आहे. असे सांगून बनावट ओळखपत्र दाखवत, दिनकर कुंभार यांना थांबवून आम्ही पोलीस अधिकारी आहोत. तुम्ही एवढे सोने कशाला घातले आहे. त्या वृध्दाला ते सोने काढुन या रुमालात ठेवा असे सांगितले. कुंभार यांनी ही आपल्या जवळ असणार्‍या अंगठी व चेन रुमालात ठेवून दिल्यानंतर अज्ञातांनी तेथून कराडच्या दिशेने दुचाकीवरून लंपास झाले.

अचानक घडलेल्या घटनेने कुंभार यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले. तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनास कळल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच आजूबाजूला असणार्‍या नागरिकांनी विचारणा करत सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

You might also like