दीपिकानंतर आता दिया मिर्झा NCBच्या रडारवर; लवकरच पाठवणार समन्स

मुंबई । सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर आता बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात ओढले जात आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे बॉलिवूडची अनेक मंडळी NCBच्या (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) जाळ्यात अडकत आहेत. NCBची टीम या प्रकरणात जेवढ्या खोलात जात आहे त्यात अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. दीपिका पादुकोणनंतर आता दिया मिर्झाचं नावंही आता समोर कथित ड्रग्स प्रकरणात आलं आहे. ड्रग्ज पॅडलर अनुज केशवानीने एनसीबीच्या चौकशीत दीया मिर्झाचं नाव घेतलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवानीने आपल्या जबाबात म्हटलं की दियाचा मॅनेजर तिच्यासाठी ड्रग्ज विकत घ्यायचा. यासंबंधीचे पुरावेही त्याने दिले. त्यामुळे आता एनसीबी लवकरच या प्रकरणात दिया मिर्झाला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान, मंगळवारी दीपिका पादुकोणचं नावही ड्रग्ज चॅटमध्ये समोर आलं आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर दीपिकाचं नाव समोर आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एका टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना समन्स बजावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like