पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत ( Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
या प्रकरणात जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्स मागितले असता आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीने फरफटत नेले आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हि घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. या ठिकाणी असलेल्या नाकाबंदीत हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. त्यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. तेव्हा त्याने हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची मागणी केली.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1398484226274562050

यावेळी संजय शेडगे याने लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी हवालदार शंकर इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली.यानंतर संजय शेडगे याने शंकर इंगळे यांना धक्का देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर शंकर इंगळे यांनी आरोपी संजय शेडगे याचा पाठलाग केला आणि पाठिमागून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस हवालदार इंगळे यांचा हात दुचाकीच्या पाठिमागील फायबरमध्ये अडकला पण तरीदेखील आरोपी न थांबत त्याने दुचाकी वेगाने पळवत इंगळे यांना दुचाकीसोबत फरफटत नेले. या घटनेत इंगळे यांना चांगलचे खरचटले आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी संजय शेडगे याला अटक केली आहे.

Leave a Comment