ग्रामीण भागात धुमाकूळ घालणारी घटफोडयांची टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर आणि शिल्लेगाव भागात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फकिरचंद चंद्रभान काळे त्याची पत्नी मिनाबाई फकिरचंद काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

अलीकडच्या काळात शिल्लेगाव व गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीचे सत्र सुरू आहे. चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या घरफोड्या येसगाव येथील पती-पत्नी करीत असल्याची माहिती निरीक्षक भगवान फुंदे यांना मिळाली होती.या माहिती वरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. हा गुन्हा त्यांचे अहेमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील अमित उर्फ अनिद कागदया चव्हाण, अभिषेक दस्त्या चव्हाण, अविनाश दस्त्या चव्हाण, श्याम बदडू भोसले सर्व राहणार पडेगाव ता.कोपरगाव, जि. अहेमदनगर या नातेवाईकांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, आणि चोरीच्या हीश्यातून मिळालेली रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपिना पुढील कारवाई साठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या टोळीकडून अजून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Comment