Tuesday, June 6, 2023

सातारा जिल्ह्यात 1 हजार 533 बाधित तर पाॅझिटीव्ह रेट 28 टक्क्यांवर

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 533 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 27. 93 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 489 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 533 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 28 टक्क्यांजवळ आला आहे. बुधवारी दिवसभरात 780 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 जणाचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी सायंकाळ पर्यंतीची स्थिती – एकूण नमूने – 24 लाख 44 हजार 641, एकूण बाधित – 2 लाख 62 हजार 650
घरी सोडण्यात आलेले – 2 लाख 48 हजार 42, मृत्यू –6 हजार 519, उपचारार्थ रुग्ण– 6 हजार 139