सोमवार दिलासादायक : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 667 बाधित तर 2 हजार 369 कोरोनामुक्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 667 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 369 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 179 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 68 हजार 002 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 41 हजार 197 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3677 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात35 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सोमवारी आलेल्या रिपोर्टमधील बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेले रूग्ण जादा आहेत. सातारा जिल्ह्यासाठी सोमवारचा दिवस हा कोरोनासाठी दिलासादायक ठरला. तसेच कोरोना बाधितांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी अगदी काही अंशी शिथिलता दिली आहे. तर कडक लाॅकडाऊन जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.