Wednesday, February 1, 2023

सातारा जिल्हयात नवे 1 हजार 742 कोरोनाबाधित, तर दिवसभरात 1 हजार 674 रूग्ण बरे होवून घरी गेले

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाधितांचा मृत्यू हा चाळीसच्या घरात येत आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 742 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले. तर काल दिवसभरात 1 हजार 674 रूग्णांनी कोरोनावर मात केली, असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 16 हजार 812 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 89 हजार 751 आहे. तर जिल्ह्यात एकूण 70 हजार 600 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2256 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. गेल्या तीन दिवसांत दीड हजारांपेक्षा जास्त बाधितांचा नवा उंच्चाकी आकडे जिल्ह्यात येत आहेत. काल दिवसभरात 1 हजार 671 रूग्ण बरे होवून घरी गेले ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.