मृत्यूदर घटला : सातारा जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 585 कोरोनामुक्त तर केवळ जिल्ह्यात 2 मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 585 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 540 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 4 (9795), कराड 99 (37705), खंडाळा 14 (13784), खटाव 83 (24063), कोरेगांव 55 (20877), माण 43 (16721), महाबळेश्वर 2 (4581), पाटण 9 (9918), फलटण 88 (34514), सातारा 105 (48029), वाई 24 (15312) व इतर 14 (1890) असे आज अखेर एकूण 238189 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 0 (215), कराड 2 (1158), खंडाळा 0 (192), खटाव 0 (594), कोरेगांव 0 (455), माण 0 (377), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (365), फलटण 0 (673), सातारा 0 (1438), वाई 0 (358) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5991 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment