सातारा जिल्ह्यात नवे 652 कोरोना पाॅझिटीव्ह तर 783 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 652 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 783 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 14 हजार 765 चाचण्या तपासण्यात करण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 878 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 32 हजार 189 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 18 हजार 361 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 630 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 27 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

माॅलमध्ये 18 वर्षाखालील मुला/ मुलींना ओळखपत्र बंधनकारक

सातारा जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2021 चे आदेशात अशी नव्याने खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करण्याऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करण्याऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्य दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा. घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. वय वर्ष 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्षे 18 खलील वयोगटातील मुला/ मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरवा म्हणून आधारकार्ड,आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

Leave a Comment