सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात 961 पॉझिटिव्ह तर 1692 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 961 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1692 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 774 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 98 हजार 412 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 84 हजार 369 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 498 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

बाधितांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्याची चिंताजनक परिस्थितीत पहायला मिळत आहे. तसेच दिवसभरात कोरणा मुक्त होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले, तर रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये सुद्धा कोरणा बाधित यांची संख्या हजाराच्या घरात गेली आहे. 10 हजारांच्या वरती गेली होती, मात्र काल दिवसभरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने पुन्हा दहा हजाराच्या खाली संख्या असल्याचे दिसून आले.

Leave a Comment