पुन्हा वाढ : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 12 कोरोना बाधित, पाॅझिटीव्ह रेट वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 12 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 628 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 978 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 8.45 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 330 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 10 हजार 904 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 97 हजार 556 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 88 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 34 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या आठवडाभरात काहीशी रूग्णसंख्या कमी होतेय असे दिसत होते. मात्र मंगळवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेली रूग्णसंख्येपेक्षा रात्री आलेल्या बाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जिल्ह्यात पुन्हा चितेंत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसांत चार आकडी बाधित तीन आकडी येत असताना पुन्हा चार आकडी संख्या आलेली आहे. सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये कराड तालुक्यातील बाधित आणि मृत्यू पावल्याची संख्या सर्वाधिक आहे.

Leave a Comment