सातारा जिल्ह्यात चालू वर्षातील कोरोना बाधितांचा उंच्चाक ५३२ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाने चालू वर्षातील उंच्चाक गाठला. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ५३२ जण बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले होते. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्ट चालू वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले, आणि नवा ५३२ चा रेकॉर्ड केला. २९३,३७१, ४९५, ३६५,४०७ तर होळी व धुळवड सुट्टीमुळे १९१ आले होते. त्यानंतर ३८३ तर बुधवारी ५३२ पॉझिटिव्ह असा आकडा कोरोना बाधितांचा आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६६ हजार पार झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण २ हजाराकडे गेले आहे.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरणा बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.

You might also like