सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह 81 हजार 827 ः नवे 1 हजार 434 वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पाॅझिटीव्हचा दर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 434 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 706 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये दीड हजारांचा टप्पा पार केला आहे. आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 434 जण कोरोनाबाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 81 हजार 827 आहे. तर जिल्ह्यात एकूण 66,606 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 11 हजार 706 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 2081 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment