सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे कामकाज घरातून तर शासकीय गाडी घरगुती कामासाठी कोकण, पुणे आणि कराडपर्यंत वापरली जात आहे. तर शासकीय गाडीतून दिवाळी सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी सांगितले.
सातारा शहरातील जिल्हा हिवताप कार्यालय हे गुरुवार पेठेतल्या जुन्या दवाखान्याच्या परिसरात आहे. या कार्यालयाला सक्षम असा अधिकारी मिळत नाही. सध्या असलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी या घरातूनच काम पहात असून ऑफिस कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालत असल्याचा प्रकार सुरु असून त्यांच्या दिमतीला असलेली गाडी घरगुती कारणासाठी वापरली जात आहे.
शासनाची ही गाडी कोकण, पुणे आणि कराडपर्यंत घरगुती कामाकरता वापरल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा हिवताप कार्यालयालाच हिवताप झाल्याचा प्रकार असून चांगल्या तपासणी देवून उपचाराची गरज आहे. गाडी शासनाची, पैसे शासनाचे आणि कामे घरची असा प्रकार हिवताप कार्यालयच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.