सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे – बंगळूर महामार्गावरील सातारा येथील वाढे फाटा चौकात रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुकांनाना आग विझविण्यासाठी अग्निशामक बंब बोलवावे लागले, या आगीत तिन्ही दुकानांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
वाढे फाटा येथे श्री. दिगंबर इलेक्ट्रिकल्स आणि त्याच्या शेजारी असलेले सलून आणि प्लंबिंग मटेरियल असणाऱ्या या तीन बंद दुकानांना आग लागली होती. रात्री उशिरा या तिन्ही दुकानातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्यामुळे स्थानिक युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची भीषणता तीव्र असल्यामुळे आगीत दुकानांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा सलूनच्या दुकानात शॉर्टसर्किटने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दोन तासात अग्निशामक दलाच्या गाडीच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे. मात्र तीनही दुकानातील साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे