Tuesday, January 31, 2023

स्पेनमध्ये पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पत्नीची काळजी घेतानाही पत्नीपासून दूर रहावं लागणार हे माहीत असल्यामुळे त्रुडो यांनी देशाचा कारभार घरूनच सांभाळायचं ठरवलं. आता असाच काहीसा प्रकार स्पेनच्या पंतप्रधानांच्या बाबतीतही घडला आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या पत्नी बेगोना गोमेझ यांची कोरोनाव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली असून अधिक सतर्कतेखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघेही सध्या त्यांच्या निवासस्थानी सुखरुप असून उपचारांनी आपण तात्काळ बरे होऊ असा विश्वास गोमेझ यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९३ झाली असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेला आहे. या आजाराचा इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलाव होईल अशी जगभरात कुणीच अपेक्षा न केल्याने आता मात्र सगळ्यांचीच धांदल उडाली आहे.