धक्क्कादायक! चोरट्यांनी रात्री पळवला 19 लाख 64 हजारांचा मुद्देमाल; तीन ठिकाणी मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग येथे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी केली. पाटील यांच्या बंद घराच्या गेटचे कुलूप काढून दरवाजाचे कूलूप तोडून लोखंडी तिजोरीतील सुमारे 19 लाख 27 हजार रुपये किमंतीचे 48 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तर दुध संकलन केंद्रातील रोख 40 हजार रुपये व मेडिकल दुकानातून 8 हजार रोख रुपये लंपास केले आहेत. खरशिंग येथील तीन्ही ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून 19 लाख 64 हजार रुपयांची चोरी केली आहे.

नितीन अभिमन्यू पाटील यांच्या घरात मोठी घरफोडी झाली. गेट, दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी उखडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चोरट्यांनी तिजोरीतील 45 ग्रॅम वजनाचे सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे गंठन, 100 ग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख रूपये किमतीचे पाटल्या व तोडे, 130 ग्रॅम वजनाचा 5 लाख 20 हजार रुपये किमंतीचा सोन्याचा हार, 22 ग्रॅम वजनाच्या 88 हजार रुपये किमंतीच्या सोन्याच्या दोन चेन, 45 ग्रॅम वजनाच्या 1 लाख 88 हजार रुपये किमंतीचा सोन्याचा नेकलेस व कानातील एअरिंग, 40 ग्रॅम वजनाच्या 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या व सहा पाटल्या, 20 ग्रॅम वजनाचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे शिक्के, 40 ग्रॅम वजनाचे 1 लाख 60 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे साखळी गंठन, 12 ग्रॅम वजनाचा 48 हजार रुपये किमंतीचा हातातील शिखकडा, 25 ग्रॅम वजनाच्या 1 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या 5 अंगठ्या असे एकूण 19 लाख 27 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

तर खरशिंग येथील अमृतधारा दूध संकलन केंद्राचे कूलूप तोडून 80 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. तर समर्थ मेडिकल सेंटरचे कुलूप काढून 8 हजार रुपये लंपास केले आहेत. नितीन पाटील यांनी घरफोडी होवून दागिने चोरीस गेल्याचे पाहीले. व पोलिसांना चोरीची मिहिती दिली.

Leave a Comment